आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेत्यांचा जल्लोष:कृष्णापुरी विकास सोसायटीत सतीश शिंदेंच्या शेतकरी विकास पॅनलचा उडाला ‘पतंग’

पाचोरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या कृष्णापुरी विकास सोसायटीत २३ वर्षांची सत्ता राखत शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून भाजप पुरस्कृत सतीश शिंदे यांनी पुन्हा १३ पैकी १३ जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर आजी, माजी आमदारांच्या समर्थकांच्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला १३ पैकी एकही जागा मिळवण्यात यश आले नाही.

पाचोरा येथील कृष्णापुरी विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक रविवारी झाल्यानंतर सायंकाळी ८.३० वाजेदरम्यान निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत ८२६ पैकी ७२४ मतदारांनी आपल्या मतादानाचा हक्क बजावला हाेता. निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस प्रेरित परिवर्तन पॅनलतर्फे १३ उमेदवार तर भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलतर्फे बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे व भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी ही १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले होते. या सोसायटीचे १ कोटी ४० लाखांचे स्व: भागभांडवल असून गत २३ वर्षांपासून सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली “अ’ वर्गात ही संस्था सुरू आहे. निवडणुकीत परिवर्तन पॅनलतर्फे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विष्णू सोनार पॅनल प्रमुख होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विलास खैरनार तर सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव नारायण चौधरी यांनी काम पाहिले. निकालानंतर शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.

यांचा झाला पराभव
तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या पराभूत उमेदवारांमध्ये बापू चौधरी (२६४), सतीश चौधरी (२७५), सुरेश देवरे (२७९), सुभाष पाटील (२८०), स्वप्निल पाटील (२७३), अभिजीत सिनकर (२७३), सुदर्शन सोनवणे (२५८), विष्णू चौधरी (२८७), इंदुबाई पाटील (२७३), कुसुमबाई पाटील (२९२), फकिरा ब्राह्मणे (३०७), रवींद्र भोई (२८१) यांचा समावेश आहे.

हे आहेत विजयी उमेदवार
कृष्णापुरी सोसायटीच्या सर्व साधारण गटात सतीश शिंदे (३९१ मते), दिगंबर अहिरे (३५७), शिवाजी चौधरी (३५८), हेमंत चव्हाण (३५८), शिवाजी महाजन (३६६), दिलीप वागणे (३५४), काशिनाथ पाटील (३४५), ओमप्रकाश पाटील (३६४), इतर मागासवर्गीय गटात प्रकाश चौधरी (४०७), महिला राखीव प्रवर्गात मुक्ताबाई बोरसे (३७२), सिंधूबाई शिंदे (४००), अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात प्रेमलाल देसाई (३८८), विमुक्त जाती जमाती प्रवर्गात धोंडू हटकर (४१३) हे विजयी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...