आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:पंकज महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती‎

चोपडा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंकज कला व विज्ञान‎ महाविद्यालयात ३ रोजी क्रांतीज्योती‎ सावित्रीबाई फुले यांची जयंती‎ साजरी करण्यात आली.‎ महाविद्यालयाचे प्राचार्य‎ आर.आर. अत्तरदे कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख‎ मार्गदर्शक प्रा.दिलीप गिऱ्हे होते.‎ सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी‎ माहिती देताना, समाजातील‎ स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी‎ तरुणींनी अग्रेसर राहणे काळाची‎ गरज आहे. तसेच स्त्रीयांना सन्मान‎ मिळावा, त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे‎ स्थान मिळावे, यासाठी‎ सवित्रीबाईंनी आपले आयुष्य खर्च‎ केले.

शिक्षणाची दारे त्यांनी‎ महिलांसाठी खुली केली. महिला‎ सुधारणेसाठी आहोरात्र काम केले.‎ त्यांच्या विचाराचे अवलोकन करावे‎ असे त्यांनी सांगितले. या‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष‎ महाविद्यालयाचे प्राचार्य‎ प्रा.आर.आर.अत्तरदे यांनी‎ सावित्रीबाई फुले यांचा कार्याचा‎ आढावा घेतला. स्त्रियांनी शिक्षण‎ घेवून सक्षम व्हावे ही काळाची गरज‎ आहे. शिक्षण हे वाघिणीचे दुध‎ आहे, असाही उल्लेख त्यांनी‎ यावेळी केला. या कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक‎ प्रा.डॉ.नंदिनी वाघ यांनी केले.‎ आभार प्रा.सुनील सुरवाडे यांनी‎ मानले. सर्व प्राध्यापक हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...