आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती वाटप:पारोळ्यात विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती वाटप ; यश हे आकाशाला गवसणी घालणारे असले पाहिजे

पारोळा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थी जीवनातच प्रत्येकाने आपले अंतिम ध्येय निश्चित केले पाहिजे. तसेच हे अंतिम ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. या प्रयत्नातून मिळालेले यश हे आकाशाला गवसणी घालणारे असले पाहिजे, असे मत संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केले. येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थिनी प्रांजली श्याम वानखेडे हिने दहावीच्या वर्गात ८५.८७ टक्के गुण मिळवून या वर्षी मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून विद्यालयातून पहिला क्रमांक मिळवला आहे. समाज कल्याण विभागाच्या शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतून तिला ५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले होते. तो धनादेश संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते प्रांजलीला वितरित करण्यात आला. या वेळी माजी सभापती रेखा पाटील, मुख्याध्यापक जी. बी. पाटील, वर्गशिक्षक आर. एस. पाटील, रावसाहेब भोसले, पी. एन. पाटील, कौस्तुभ सोनवणे, श्याम वानखेडे हजर होते. या वेळी एम. वाय. लिंगायत, पी. आर, पाटील, जे. एच. भोई, बी. व्ही. पाटील, उन्नती पवार, प्राजक्ता भामरे, जयश्री पाटील, सुनील नावरकर, वाय. के. पाटील, देविदास पारधी आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...