आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन:शालेय पोषण आहाराचे लेखापरीक्षण थांबवावे : प्राथमिक शिक्षक महासंघ

अमळनेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक शाळेतील पोषण आहाराचे लेखा परीक्षण थांबविण्याची मागणी, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी एस.पी.चव्हाण यांना निवेदन दिले.शासनाने प्रत्येक प्राथमिक शाळेच्या २०१५ पासूनच्या नोंदवह्या तसेच इतर झेरॉक्स सोबत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक विभागात बहुतांश शाळांमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक आणि लिपिक नाहीत. त्यातच कोरोनानंतर नव्याने सुरू झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याची धडपड सुरू असताना, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, निपुण चाचणी, सेतू अभ्यासक्रम आणि दैनंदिन अभ्यासक्रमाची जबाबदारी सांभाळताना, लेखापरीक्षणासाठी क्लिष्ट माहिती शिक्षकांना तयार करावी लागणार आहे. त्यामुळे या कामासाठी लागणाऱ्या वेळेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शिवाय अपूर्ण माहिती सादर केल्यास कर्मचाऱ्यांना २५ हजारांचा दंड होणार आहे. म्हणून शालेय पोषण आहाराचे लेखापरीक्षण थांबवावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...