आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:शेंदुर्णी पालिकेवर तीन दिवसांतच दुसरा मोर्चा

शेंदुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपंचायतने प्रस्तावित केलेली करवाढ व प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी शेंदुर्णी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायतीवर बुधवारी मोर्चा काढला. या मागणीसाठी नगरपंचायतीवर धडकलेला, तीन दिवसांतील हा दुसरा मोर्चा ठरला. यापुर्वी सोमवारी दि.३१ रोजी पालिकेवर मोर्चा काढला होता.गरूड पतसंस्थेच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड, सागरमल जैन, सुधाकर बारी, डॉ. किरण सुर्यवंशी अग्रभागी होते. नगरपंचायत कार्यालयात मोर्चा पोहोचल्यावर मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे मोर्चाला सामोरे गेले. सुधाकर बारी, राजेंद्र पवार, भगवान अहिरराव, विलास अहिरे, प्रवीण गरूड, अॅड.प्रसन्न फासे, अनिल झंवर, गजानन बारी, नंदकिशोर बारी, विजय चौधरी, भरत बारी, योगेंद्र बारी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्रीराम काटे, गजानन धनगर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...