आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीसाठी रविवारी मतदान होत आहे. या पतपेढीच्या निवडणुकीसाठी जामनेर तालुक्यातून तिरंगी लढतीचे चित्र आहे. तालुक्यातील एकूण ६०० मतदार मतदानाद्वारे आपला सदस्य पतपेढीत पाठवणार आहेत. शिक्षणाची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जामनेर तालुक्यात जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी व शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीच्या मोठ्या शाखा आहेत.
सहाजिकच सर्वाधिक मतदार याच संस्थांचे आहेत. त्यामुळे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक असलेले दिनेश पाटील तर शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीच्या शेंदुर्णी शाखेतील आबा पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर जामनेर एज्युकेशन सोसायटीच्या मालदाभाडी शाखेतील विजय सैतवाल हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. सैतवाल यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यात तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत एकूण ६३१ मतदार मतदानाची भूमिका बजावून आपला सदस्य माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीत पाठवणार आहेत. पतपेढीच्या या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून यासाठी रविवारी मतदान घेण्यात येणार आहे.
असे आहे बलाबल तालुक्यात जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या जामनेरसह फत्तेपूर, मालदाभाडी अशा तीन शाखा आहेत. या तीनही शाखांमध्ये मिळून एकूण ११६ तर शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीच्या शाखांमध्ये १९४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. यासह तालुक्यातील एकूण ३३ शाळांमधील ६३१ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.