आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने शहर सुरक्षित झाले आहे. कॅमेऱ्यांचे मालक जनताच आहे, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. ही यंत्रणा कायमस्वरूपी टिकून राहिल्यास गुन्ह्यांवर आपोआप नियंत्रण येईल, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केले. अमळनेर येथे ढेकू रोडवरील पोलिस चौकी व सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन करताना गुरुवारी ते बोलत होते.
अमळनेर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ढेकूरोडवर नवीन चौकी उभारण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी उपक्रमाचे कौतुक केले. अपघातग्रस्तांना मदत करणारे सुनील हटकर व शेखर साळुंखे, दामिनी पथकातील नम्रता जरे यांचा सत्कार केला. बाळासाहेब भदाणे, पवन देशमुख यांच्या सहकार्याने पोलिस चौकी तर राजेंद्र अग्रवाल, प्रकाश मुंदडा, प्रताप साळी, विजय जैन, डॉ.सुमित सुर्यवंशी, सागर पाटील, उमेश साळुंखे यांच्या योगदानातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. संपादक रवी टाले, बंडू जैन आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.