आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा:शेंदुर्णीसह 10 गावांची सुरक्षा एकाच पोलिसावर ; स्वतंत्र पोलिस ठाण्याची आवश्यकता

शेंदुर्णी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे आऊट पोस्टवर केवळ एकच पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखताना एका पोलिसाची तारांबळ उडते. पहूर पोलिस स्टेशन अंतर्गत शेंदुर्णी आऊटपोस्ट येते. वास्तविक येथे स्वतंत्र पोलिस ठाणे असावे अशी मागणी प्रलंबितच आहे. शेंदुर्णी नगरपंचायत हद्द व आजूबाजूची दहा गावे शेंदुर्णी आऊटपोस्टला जोडलेली आहे. ४० हजार लोकसंख्येचे शेंदुर्णी व धार्मिक तीर्थक्षेत्र आराखडा असलेल्या शहराचा वाढता विस्तार पाहता येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची आवश्यकता आहे. तसा प्रस्तावही वरिष्ठांकडे सादर झालेला आहे परंतु सध्या आऊट पोस्टवर एक किंवा दोनच पोलिस कर्मचारी उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांची देखील तारेवरील कसरत होते.

बातम्या आणखी आहेत...