आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:सीनिअर पेट्रन फेलाेज, सर्वसाधारण गटात दाेन मते देणे असेल बंधनकारक

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीतील संचालक पदाच्या एकूण १८ जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर आता आगामी १३ नोव्हेंबरला १६ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत मतदान कसे असेल, याबाबत मतदारांना उमेदवारांकडून माहिती देण्यात येत आहे.

या मतदान प्रक्रियेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या तीन जागांसाठी एक-एक तसेच सिनियर पेट्रन फेलो आणि सर्वसाधारण या गटांमध्ये प्रत्येकी दोन-दोन जागा तर डोनर या गटात एकूण पाच जागा अशा एकूण १६ जागांवर मतदारांना मतदान करावयाचे आहे. या प्रक्रियेत सिनियर पेट्रन फेलो आणि सर्वसाधारण या गटातील विविध मतपत्रिकेवर उमेदवार कमी-अधिक प्रमाणात असताना दोन मते देणे बंधनकारक आहे. अन्यथा मतपत्रिका बाद होणार असल्याने या गटातील उमेदवारांना प्रचार करताना मत पत्रिकेत मतदान कसे करावे, याबाबतही सभासद, मतदारांना माहिती द्यावी लागतेय. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव या गटातील स्वतंत्र मतदान पत्रिकेवर एक-एक मत देणे सोपे आहे.

मात्र सिनियर पेट्रन या गटात दोन मते द्यावयाची असल्याने या गटात चार उमेदवार ही बरोबर आहेत. मात्र, पेट्रन व सर्वसाधारण गटात प्रत्येकी दोन मते द्यावयाची असताना या तिन्ही गटांत अवघे तीन-तीन उमेदवार मतपत्रिकेवर असतील. या तिन्ही गटातील मतपत्रिकेवर मतदाराला तीन उमेदवार असले तरी दोन मते देणे बंधनकारक आहेत. मतदाराने एकच किंवा तीन मते दिल्यास मतपत्रिका बाद होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तर प्रत्येक मत पत्रिकेच्या खाली मतदारांसाठी सूचनाही मतपत्रिकेवर देण्यात येणार असून त्या वाचूनच मतदान करावे लागणार आहे. यात बहुतांश वयोवृद्ध आणि अल्पशिक्षित मतदारांचा गोंधळ उडून मतदान पत्रिका बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...