आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:डॉ.नीलेश पवार यांना सेवा योजना पुरस्कार; प्रमाणपत्र देऊन गौरव

अमळनेर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थी व प्राध्यापकांना, गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेत भरीव कामगिरी केल्याबद्दल, महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेल्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मंगळवारी झाला. त्यात प्रा.डॉ.नीलेश पवार यांना राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वर्ष २०१९-२० साठी प्रा. डॉ. नीलेश शांताराम पवार (कार्यक्रम अधिकारी, प्रताप महाविद्यालय अमळनेर) (स्वायत्त) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. खान्देश शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष हरी वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, संदेश गुजराथी, नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी.आर.शिरोडे, डॉ. जयेश गुजराथी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...