आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणगाव शहराजवळ दरोडा:मारहाण करून लांबवली सात हजारांची राेकड, वाहनाचेही नुकसान; धरणगाव पोलिस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल

धरणगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा ते धरणगाव मार्गावर गाडी अडवून धाडसी दरोडा टाकून ७ हजार २०० रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच वाहन चालकासह एकाला मारहाण करून वाहनाचेही नुकसान केल्याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात भय्या माळी (पेंटर) व इतर १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाेपडा येथील धनगर गल्लीतील मेहुल सुनील शिरसाठ (वय २४) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, भय्या माळी (पेंटर) व इतर १० ते १५ व्यक्तींनी मेहुल शिरसाठ यांच्या मालकीच्या अशोक लेलँड कंपनीच्या गाडी (एमएच- १९, सीवाय- ६९८४)त ९ मे रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अशोक सुदाम मिस्तरी यांच्या मालकीचे ४ बैल भरले. ही गुरे ते जामनेर तालुक्यातील नेरी येथील बाजारात विक्रीसाठी घेऊन जात होते. चोपडा ते धरणगाव रोडवर साळवा फाट्याजवळ मेहुल यांच्या वाहनाच्या पुढे वाहन आडवे करून यातील १० ते १२ व्यक्तींनी मेहुल यांना तोंडावर, पाठीवर पोटावर व छातीवर मारहाण केली.

तसेच मेहुल यांच्या जोरात बुक्का मारून डोळ्यास इजा केली. त्यांच्या सोबत असलेल्या कालू उखा चव्हाण यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मेहूल यांच्या वाहनाची चावी व खिशातले ७ हजार २०० रुपये हिसकावून वाहनाने चोपड्याकडे पळून गेले. तर भय्या माळी याने वाहनाच्या क्लिनर साइडच्या पुढील व मागील दोन्ही टायरांना चाकू मारून नुकसान केले. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकात भय्या माळी व इतर १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल अमोल गुंजाळ करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...