आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता मोहीम:पाराेळ्यात गटारींची स्वच्छता मोहीम;‎ पालिका प्रशासन लागले कामाला‎‎

पारोळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राष्ट्रीय महामार्गावर अनेक‎ भागात दुकानांचे अतिक्रमण झाले‎ असून त्याचा त्रास मात्र बाजार‎ समिती आवारातील कर भरणाऱ्या‎ दुकानदारांना होत अाहे. मात्र बाजार‎ समितीकडून काेणतीही कारवाई‎ होत नसल्याने नाराजी पसरली‎ होती. या बाबत काही संघटनांनी‎ कारवाईची मागणी केली होती. या‎ प्रश्नाकडे ‘दिव्य मराठी’ने‎ प्रशासनाचे लक्ष वेधले. वृत्त प्रसिद्ध‎ हाेताच न.पा. प्रशासन स्वच्छतेच्या‎ कामाला लागले आहे.‎

या भागात अमळनेर रस्त्यालगत‎ अनेक हॉटेल धारकांनी परिसरात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मोठ्या प्रमाणात गटारीमध्ये घाण‎ टाकल्याने गटारी जाम होऊन त्या‎ अाेसंडून अथवा फुटून त्यातील‎ पाणी अनेक दुकानांच्या परिसरात‎ शिरले होते. त्याचा त्रास‎ दुकानदारांसह मराठा सेवा संघाचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अध्यक्ष‎ डॉ.शांताराम पाटील यांनाही सहन‎ करावा लागत हाेता. त्यांनी पारोळा‎ पालिकेला पत्र दिले होते. त्यानुसार‎ ‘दिव्य मराठी’ने या समस्येबाबत‎ वृत्त प्रसिद्ध केले. त्याची पालिकेने‎ दखल घेतली.‎

बातम्या आणखी आहेत...