आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:स्वप्नांचा चुराडा़; शेतकऱ्यांचे केळी बागांचे प्रचंड नुकसान

चोपडा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील तापीनदीकाठावरील गोरगावले, धनवाडी परिसरातील १५ गावांना गुरुवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान वादळाचा जोरदार तडाखा बसला, त्यात सुमारे ५०८ हेक्टरवरील ७६२ शेतकऱ्यांचे केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालो. नुकसान झाल्याच्या वृत्ताने एका शेतकऱ्याला हदयविकाराचा तीव्र झटका बसला.

चोपडा तालुक्यात १५ गावांना तडाखा
५०८ हेक्टरवरील केळी भुईसपाट
वादळाचा गोरगावलेत सर्वाधिक फटका़

७६२ शेतकऱ्यांचे झाले नुकसान
वादळी पावसात गोरगावले बु. गावात २३८ शेतकऱ्यांचे १८५ हेक्टर, वडगावसीम येथे १२८ शेतकरी ७४ हेक्टर, धनवाडी गावातील १८ शेतकरी-२३ हेक्टर, कोळबा गावातील ४२ शेतकरी २२ हेक्टर, कठोरा गावातील ८८ शेतकरी ३७ हेक्टर, खडगाव गावातील १२ शेतकरी २७ हेक्टर, गोरगावले खुर्द गावातील ४२ शेतकरी २३ हेक्टर, वडगाव खुर्द गावातील १२ शेतकरी ३ हेक्टर, खेडीभोकरी गावातील ३५ शेतकरी १५ हेक्टर, सनपुले गावातील १७ शेतकरी ९ हेक्टर, घुमावल गावातील ३८ शेतकरी ४८ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी दिली.

गोरगावले मंडळात २१ मि.मी. पाऊस
चोपडा तालुक्यात ९ रोजी झालेल्या पावसाची नोंद चोपडा तहसील कार्यलयात झाली आहे. एकूण सात मंडळापैकी गोरगावले मंडळात २१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे तर चहार्डीत ३ मि.मी तर उर्वरित पाच मंडळात पाऊस नसल्याची नोंद आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला
गोरगावले येथे मोठे नुकसान झाले. आदर्श शेतकरी भागवत महाजन, अविनाश पाटील, भूषण महाजन, मनोज पाटील, अरुण महाजन, प्रशांत महाजन, कृउबाचे सभापती प्रल्हाद पाटील, खडगावचे दत्तात्रय पाटील, रोहिदास कोळी, देविदास पाटील, महेश महाजन, सुदर्शन पाटील, राजेंद्र पाटील, खुशाल महाजन, प्रवीण पाटील आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...