आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील आदिवासी ठाकूर बांधवांच्या परंपरागत शिमगा उत्सवानिमित्त, यंदा महिलांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. अमळनेर येथील श्रीराम कॉलनी परिसरातील शेतात, ठाकूर बांधव होळीचा सण साजरा करतात. यंदा समजातील सुवासिनींच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. पारंपरिक पद्धतीने होळीची रचण्यात आली होती. होळीसाठी केवळ कोरडी लाकडे व गोवऱ्यांचाच वापर केला जातो. होळीसाठी पूजा व सजावट साहित्य देणगी स्वरुपात संकलित केले जाते. होळीला रंगीबेरंगी पताका, फुगे लावून सजवले होते.
समाजाचे अमळनेर प्रमुख दिलीप ठाकूर, रणजित शिंदे, दिलीप वानखेडे, गुणवंत वाघ, गुणवंत वाघ, शेखर ठाकूर, अनिल ठाकूर आदिंनी होळीला पुष्पहार, हार कंगन अर्पण करून पूजन केले. महिला मंडळाच्या पदाधिकारी अपेक्षा पवार, मिना ठाकूर, रेखा ठाकूर, स्वाती ठाकूर, मंगल ठाकूर, स्वप्ना ठाकूर, पूनम ठाकूर, कल्याणी सूर्यवंशी, आदिती ठाकूर आदिंनी नैवेद्य अर्पण करून होळी पेटवली. होळीच्या अग्नीभोवती उत्साही वातावरणात फेर धरण्यात आला.
पाच दिवसीय होळीचा शिमगा उत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जात आहे. होळीचा प्रसाद म्हणून गुळाची जिलेबी सर्वांना वाटण्यात आली. रविंद्र वानखेडे, प्रकाश ठाकूर, विजय ठाकूर, सुखदेव ठाकूर, नीलेश वाघ, उमेश ठाकूर, यशवंत सूर्यवंशी, उमाकांत ठाकूर, सुरेश ठाकूर, दिपक ठाकूर, किरण सूर्यवंशी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.