आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:नुकसान भरपाईसाठी शिंदे यांचे मंत्र्यांना साकडे

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाचाेरा व भडगाव तालुक्यातील काही भागात १८ आॅक्टाेबर राेजी झालेल्या अतिवृष्टीसदृष्य पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष अमाेल शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.तालुक्यातील वाणेगाव, निंभोरी, लासुरे, लोहारी व मोंढाळेसह भडगाव तालुक्यातील काही भागांत १८ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजता अतिवृष्टी सदृश पावसाने थैमान घातले हाेते. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून गेला हाेता. ऐन दिवाळीत शेतकरी संकटात सापडले हाेते.

अशा संकट काळात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिवाळीच्या दिवशी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली होती. पावसामुळे परिसरातील कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी व इतर पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती. या संदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांची २ नोव्हेंबरला भेट घेतली. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी ही पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्काळ मार्गी लावू असे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...