आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडसाद:शिवसैनिक म्हणतात आमची निष्ठा पक्षावर, शिंदेसारखी अनेक वादळे आली-गेली, शिवसेना पुन्हा उभारी घेईल

चाळीसगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आमदारांनी बंड केल्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये बंड केलेल्या या आमदारांबाबत नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिव्य मराठीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. एकनाथ शिंदेसह आमदारांचे हे पाऊल चुकीचे असून एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला.

आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत ^जे झाले ते चुकीचे झाले, असे व्हायला नको होते, एकनाथ शिंदे यांनी हा निर्णयापर्यंत जायला नको होते. यामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही. अशी अनेक वादळे आली अन गेली, शिवसेना पुन्हा उभारी घेईल. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. भीमराव खलाणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख

पक्षाने सर्व काही दिले असताना बंड करणे चुकीचे ^आतापर्यंतचे हे पाचवे बंड आहे. असे बंड सेनेने पचवले आहेत. शिवसेनेत नेते मोठे झाले अन‌् गेले, पक्ष थांबला नाही; वाढतच गेला. पक्षाने सर्व काही दिले असताना बंड करणे चुकीचे आहे. सामजस्यांने पक्षप्रमुखांकडे विषय मांडला असता तर तोडगा निघाला असता. अजूनही चर्चेतून मार्ग निघेल. अशी आशा आहे. - नंदकशिोर बाविस्कर, माजी नगरसेवक व शिवसैनिक

कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या ^कार्यकर्त्यांमुळे पक्ष मोठा होतो. नेता मोठा होतो. एकनाथ शिंदे यांना पक्षाने सर्वकाही दिले. परंतु कुठल्यातरी आमिषाला बळी पडून या प्रकारे बंड केले हे चुकीचे आहे. आज त्यांना काय साक्षात्कार झाला की भाजपाच्या दारात जाण्याची गरज पडली. यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. एक निष्ठावाव शिवसैनिक म्हणून आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहाेत. शैलेंद्र सातपुते, शिवसैनिक

पक्षनिष्ठा महत्त्वाची ^आमदारांनी प्रलोभनाला अथवा दबावाला बळी पडायला नको होते. यांच्या सांगण्यामुळेचे अगाेदर युती तुटली होती. आता तीन पक्षाचे सरकार आहे. पक्षप्रमुखांशी चर्चा करून तोडगा निघाला असता. भाजपाच्या आहारी जावून असा पवित्रा घेणे योग्य नाही. याच्याने पक्षाला काही फरक पडणार नाही. तळागळातील शिवसैनिक हे खपवून घेणार नाही. पक्षनिष्ठा महत्वाची आहे. गोपाला दायमा, ज्येष्ठ शिवसैनिक

शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत ^आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांचे पाईक आहोत शिवसेनेने आज पर्यंत असे अनेक चढ-उतार पाहिले आहेत शिवसेना शिवसैनिकांच्या भक्कम पायावर उभी आहे निवडून आलेले लोकप्रतिनिधी कुठे गेले आणि आले याने शिवसेनेला फरक पडणार नाही. शिवसैनिक पुन्हा भक्कमपणे शिवसेना उभी करतील. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. दिलीप घोरपडे, तालुका प्रवक्ता, चाळीसगाव

आम्ही गुलाबराव पाटील यांच्यासोबत : देशमुख शिवसेना शहरप्रमुख आबा देशमुख यांनी सांगितले की,अर्ध्या रात्री कार्यकर्त्यांनी हाक दिली तरी गुलाबराव पाटील असे एकमेव नेते आहेत, जे धावून येतात. शिवसेना हा पक्ष नसून विचार आहे, कुटुंब आहे आणि हा कुटूंबातील अंतर्गत वाद असून या वादाचा तोडगा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी सोडवावा. गुलाबराव पाटील यांच्यासोबत आम्ही आहेत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील म्हणाले की, सध्या हा संघर्ष पाहता आज आम्ही आमदार लता सोनवणे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सोबत आहोत ते देखील शिवसेनेतच आहेत.