आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:धरणगावमध्ये दुकान अन् हॉटेल फोडले; या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

धरणगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव रोडवरील श्री संताजी तेल घाणा आणि हॉटेल लव फोडून चोरट्यांनी साधारण ३५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव रोडवरील रेल्वे स्थानकापुढे श्री संताजी तेल घाणा आणि हॉटेल लव हे शेजारी- शेजारी आहेत. तेल घाण्याचे संचालक दिनेश गोसावी यांनी ५ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. परंतु दुसऱ्या दिवशी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास दुकान फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे डीव्हीआर यंत्र आणि गल्ल्यातील १५०० रुपये रोख त्याचप्रमाणे साधारण १९ हजार रुपये किमतीच्या शेंगदाणा, तीळसह इतर तेलाच्या बाटल्या लंपास केल्या आहेत. तसेच संताजी तेल घाण्याला लागूनच असलेले चंदन राजपूत यांच्या मालकीचे हॉटेल लव चिकनच्या गल्ल्यातील साधारण १ हजार रुपयांची चिल्लर ही चोरट्यांनी लांबवली आहे. याप्रकरणी दिनेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. तपास हवालदार उमेश पाटील करत आहेत. या चोरीमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बातम्या आणखी आहेत...