आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात कन्नड घाटाच्या पायथ्याशी बोढरे नियतक्षेत्रात घाणेरीच्या झुडुपाजवळ अनोळखी महिलेचा सांगाडा आढळला. घटनास्थळी साडी, ब्लाऊज व परकर असे कपडे आढळल्याने, सांगाडा महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. दोन ते तीन महिन्यांपुर्वी अज्ञात आरोपीने महिलेचा खून करून तिचा मृतदेह गोणपाटात टाकून तो घाटाच्या पायथ्याशी फेकून दिल्याचा संशय आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोढरेचे वनपाल दीपक जाधव हे दि.१२ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास जुनोने जंगल भागात गस्तीवर होते.
वनरक्षक अजय महिरे यांनी त्यांना माहिती दिली की, चाळीसगाव-कन्नड महामार्ग क्रमांक २११वर घाटाच्या पायथ्याजवळील दर्ग्यापासून २०० मीटर अंतरावर, बोढरे नियतक्षेत्रात घाणेरी झुडुपाजवळ गोणपाटातून साडी बाहेर आलेली असून, गोणपाटाच्या शेजारी मानवी हाडे असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर दीपक जाधव हे घटनास्थळी गेले. त्यावेळी गोणपाटाजवळ मानवी हाडे दिसली. ही माहिती नंतर ग्रामीण पोलिसांना कळवली.
तपासाचे आव्हान दोन ते तीन महिन्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने खून करून महिलेचा मृतदेह गोणपाटात भरून घाटात टाकून दिला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांपुढे या गुन्ह्याच्या तपासाचे मोठे आव्हान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.