आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काढला भाव:देवशयनी एकादशीला पाडळसरेत खोपडी पूजा

पाडळसरे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक महिन्यात येणाऱ्या देवषयनी आषाढी एकादशीला संपूर्ण गावात पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली. ऊस वा ज्वारी, चिकणी आदींच्या पांच तोट्याची देवखोपडी तयार करून चौकाचौकात देव्हाऱ्यात असलेल्या देवांची पूजा करण्यात आली. तसेच खरीप व रब्बी हंगामातील मालाचे भाव लहान मुलांना बसवून पूजन करून काढण्यात आले.

या वर्षी ही परंपरा कायम ठेवून केळी, कापूस व तुरीला चांगला भाव मिळेल, असा अंदाज आज वर्तवण्यात आला. खोपडीत देव पूजन झाल्यावर गावातील विवाह सोहळा करण्यास सुरुवात हाेत असून ही पारंपरिक पद्धत आजही तशीच कायम आहे. ज्येष्ठ नागरिक दिलीपचंद गंभीर गुर्जर यांच्या चौकात पूजेसाठी तयार केलेल्या खोपडीत कार्तिकी देवषयनी एकादशीनिमित्त राम व शाम या दोन्ही भावांची पूजा करण्यात आली. त्यानंतर देव्हाऱ्यातील देवांची खोपडीत ठेवून खोपडीसह पूजा झाली.

बातम्या आणखी आहेत...