आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सामाजिक कार्यामुळेच मिळते वेगळी ओळख ; स्वर्गीय कुशल तिवारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अन्नदान

एरंडोल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात धन, संपत्ती किती कमावली यापेक्षा सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे वेगळी ओळख निर्माण होत असते, असे प्रतिपादन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले. स्वर्गीय कुशल तिवारी यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे आजही त्यांची समाजात वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील खडके बुद्रुक येथील अनाथ मुलांच्या बालगृहात स्वर्गीय कुशल तिवारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या अन्नदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी तिवारी परिवाराच्या वतीने अनाथ बालकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. भाऊसाहेब पंडित यांनी आभार मानले. या वेळी राहुल तिवारी यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमास स्वर्गीय कुशल तिवारी यांचे वडील किरण तिवारी, आई शोभा तिवारी, भाऊ राहुल तिवारी, विशाल तिवारी, दर्शना तिवारी, अर्चना तिवारी, सोनाली तिवारी, प्रथम तिवारी, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपनिरीक्षक शरद बागल, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, जयेश पांडे, शिवाजी वाल्डे, मिलिंद वाल्डे, कर्णवीर ठाकोर, विजय मराठे, चेतन चौधरी, पत्रकार संजय चौधरी, आल्हाद जोशी यांच्यासह तिवारी परिवारातील सदस्य व कुशल-दादा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्याची दिली माहिती
या वेळी तहसीलदार सुचिता चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांनी कोरोना काळात स्वर्गीय कुशल तिवारी यांनी गरीब नागरिकांना केलेल्या मदतीची माहिती दिली. अनाथ मुलांचे बालगृह आणि स्वर्गीय कुशल तिवारी यांचे अत्यंत भावनिक नाते होते, असे ही त्यांनी सांगितले. बालगृहाचे अधीक्षक मधुकर काटे यांनी स्वर्गीय कुशल तिवारी यांनी अनाथ मुलांसाठी केलेल्या मदतीबद्दल माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...