आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागवड:शिवार फुलणार  दमदार पावसाने पेरणी सुरू; १२ हजार हेक्टरवर कापूस लागवड

अमळनेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोयाबीन, उडीद, मूग, तूर, बाजरी पेरणीला वेग

शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाने खरीप हंगामाची पेरणी जोमात सुरु झाली आहे. तालुक्यात १२ हजार हेक्टर क्षेत्रावर बागायती कापसाची लागवड झाली असून इतर ज्वारी, बाजरी व सोयाबीन, उडीद, मूग, तूर पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. २० टक्के बागायती पिकांची लागवड झाली आहे. यंदा दमदार पावसाने उशिरा हजेरी लावल्याने जून अखेर पेरण्यांना सुरूवात झाली. खरीप पेरण्यांनी वेग धरला आहे. तालुक्यातील काही भाग वगळता तालुक्यात सर्वत्र कमी, अधिक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जमिनीत पेरणीलायक ओलावा वाढला आहे. या मुळे कापूस, मका, ज्वारी, बाजरी, उडिद, मूग, तूर, तीळ, भुईमूग, सोयाबीन तसेच ऊस, केळी व फळबागांसह इतर पिकांची पेरणी ही सुरू झाली आहे. दरम्यान, गतवर्षी प्रचंड पाऊस झाल्याने या अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसला होता. पाण्याचा स्तर चांगला वाढला होता.

चांगल्या उत्पन्नाची आशा
आतापर्यंत तालुक्यातील शेतकरी पेरणीलायक पाऊस पाडवा म्हणून प्रतीक्षा करत होते. असे असतानाच जून अखेर दमदार पावसाने तालुक्यात हजेरी लावली, त्यामुळे पेरणीस सुरुवात झाली आहे. यंदा १०० टक्क्यापर्यंत पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा आहे.

कापूस लागवडीला वेग
तालुक्यात आतापर्यंत १२ हजार ७८६ हेक्टर क्षेत्रावर बागायती व जिरायती कापसाची लागवड झाली आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे उत्पन्नात घट आली होती. यंदा, चांगला पाऊस होत असल्याने कापूस लागवडीसह इतर पिकांच्या पेरणीने वेग घेतला आहे. तर इतर बागायती पिकांसह उसाची आतापर्यंत १८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी सुरु झाली आहे.