आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विवाहितेचा छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोरा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव रोडवरील रहिवाशी शिल्पा ठाकूर यांचा धामणगाव येथील राजसिंग ठाकूर यांच्याशी सन २०१५मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना ६ वर्षाचा शिवांष नावाचा मुलगा आहे. तर पती राजसिंग ठाकूर मद्याचे व्यसन असल्याने ताे कर्जबाजारी झाला हाेता. शिल्पा हिने पती राजसिंगलला समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, राजसिंग सतत मद्य प्राशन करुन मारहाण करणे तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणावे, यासाठी शिल्पाचा छळ करत हाेता. दरम्यान यामुळे १५ ऑगस्टपासून शिल्पा माहेरी आली आहे. या प्रकरणी आज शिल्पा ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरुन पाचोरा पोलिस ठाण्यात पती राजसिंग ठाकूर, मेघा ठाकूर व दीर अक्षय ठाकूर यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...