आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारांबळ:कासोदा परिसरात पावसाचा शिडकावा

पारोळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह परिसरात मंगळवारी अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे कासोदा परिसरातील जिनिंग चालकांची तारांबळ उडाली. उघड्यावर ठेवलेला कापूस झाकून ठेवण्यासाठी कसरत करावी लागली.कासोदा परिसरात अनेक जिनिंग उद्योग कार्यरत आहेत. सध्या कपाशीची आवक कमी असल्याने अनेक जिनिंगच्या आवारात कापूस उघड्यावर ठेवण्यात आला आहे. पुरेशा प्रमाणात कापूस खरेदी झाल्यावर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते.

मात्र, मंगळवारी रात्री आणि पहाटे झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे कापूस भिजण्याची भीती होती. काही जिनिंगमध्ये शेडची व्यवस्था नसल्याने कापूस झाकण्यासाठी मजुरांची धावपळ झाली. पावसाच्या शिडकाव्यामुळे शेतात वेचणीवर आलेल्या कपाशीलाही फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे शेतातून कापूस वेचणी करून घेण्यावर परिसरातील शेतकरी भर देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...