आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळाची ओढाताण:एसटी बसेस पुन्हा खासगी पेट्रोल पंपांच्या दारात; शासकीय दर 24 रुपयाने जास्त

चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने डिझेलवरील अनुदानाबाबत निर्णय घेतल्याने डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे. खासगी पंपाच्या तुलनेत शासकीय खरेदीसाठी लिटर मागे २४ रुपये जादा मोजावे लागत आहेत. यामुळे खासगी पंपावरून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास मिटला नसला तरी चाळीसगाव आगारातील ७६ बसेस पैकी ३५ बसेस सुरू आहेत. इंधन दरवाढ व कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सध्या एसटी महामंडळाची ओढाताण सुरू आहे. डिझेल महाग झाल्याने एसटी बसेस डिझेल भरण्यासाठी पुन्हा खासगी पेट्रोल पंपांच्या दारात उभ्या राहत आहेत. दरम्यान, महामंडळाच्या पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या डिझेलच्या तुलनेत खासगी पेट्रोल पंपांवर डिझेलचे दर कमी आहेत. त्यामुळे बसेसमध्ये खासगी पंपावरुन डिझेल भरण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. २३ मार्चपासून चाळीसगाव आगाराच्या बसेस खासगी पेट्रोल पंपांवरील डिझेलवर धावत आहेत. गत वर्षीही केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने सबसिडी काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे डिझेल दरात वाढ झाल्याने राज्य परिवहन सेवेला आर्थिक तोटा सोसावा लागला होता. भुर्दंड सहन करणे अशक्य ...

लिटरला २४ रुपये जादा मोजल्यास एसटीला २ लाख १० हजार जादा मोजावे लागतील. खासगी पंपावर डिझेल भरल्याने ही रक्कम वाचवण्यात यश आले आहे. इंधन दर वाढल्याने अगोदरच तोट्यात असलेल्या लालपरीला भुर्दंड बसत आहेत. यातून मार्ग काढत शासनाने गत आठवड्यात खासगी पंपावरून डिझेल भरण्याचे आदेश दिले होते. गेल्या साडेचार महिन्यांपासून एसटी महामंडळाला घरघर लागली आहे.

लिटरमागे २४ रुपयांचा फटका
एसटी महामंडळाला यापूर्वी मिळणाऱ्या डिझेलसाठी लिटरमागे २४ रुपयांचा फटका बसत होता. डिझेलचे किरकोळ दर कमी असल्याने महामंडळ खासगी पेट्रोल पंपांकडे वळले आहेत. पूर्वी डिझेल करिता २० रुपये जास्त मोजावे लागल्याने महिनाभरात लाखो रुपये डिझेलसाठी जास्त भरावे लागत होते. एसटी महामंडळाला डिझेलसाठी प्रतिलिटर १२० रुपये मोजावे लागत होते.

शाेधला पर्याय
आता इंधन महागल्याने पर्याय शोधून डिझेल स्वस्तात मिळवले आहे. यापूर्वी महामंडळाने सन २०१३-१४मध्ये असा प्रयोग केला होता. तब्बल एक वर्ष खासगी पंपावरून डिझेल खरेदी केले होते. आताही तशीच स्थिती असल्याने महामंडळाने पुन्हा हा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...