आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:सावदेतील स्मशानभूमीला तारेचे कंपाउंड, वृक्षारोपण

भडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सावदे येथील स्मशानभूमी परिसरात स्वच्छता करून तेथे लाेकवर्गणी व श्रमदानातून तारेचे कंपाऊंड घालण्यात आले. तसेच वृक्षाराेपणही करण्यात आले.

सावदे येथे गिरणा नदीच्या पायथ्याशी स्मशानभूमी परिसरात झाडाझुडपांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरल्याने अस्वच्छतेचे वातावरण झाले होते. अंत्यविधीवेळी नातेवाइकांसह ग्रामस्थांना, उपस्थितांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे ग्रामस्थांसह तरुणांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमीचा संपूण परिसर स्वच्छ करुन सुशोभीकरण करण्याचे ठरवले. त्यानुसार स्मशानभूमी परिसर जेसीबी मशिनच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर तार कंपाउंड करून वृक्षारोपण केले.

परिसरात निंब, वड, शिसव आदी विविध उपयुक्त प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली. यासाठी आजी-माजी ग्रा.पं., विकासाे पदाधिकारी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष डॉ.नीळकंठ पाटील, विठ्ठल राजपूत आदी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...