आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळपाचा शुभारंभ:चोसाकाच्या गाळप हंगामास प्रारंभ; यंदा सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

चोपडा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील चोसाकाच्या अर्थात बारामती ॲग्रो युनिट क्रमांक -४ च्या गाळपाला बुधवारपासून सुरुवात झाली. यंदा कारखान्याने सहा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. चोपडा तालुक्यातील नेत्यांच्या उपस्थितीत मोळी टाकून गाळपाचा शुभारंभ झाला.

कार्यक्रमाला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अॅड.घनश्याम पाटील, चेअरमन अतुल ठाकरे, माजी पं.स.सभापती कांतीलाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या इंदिरा पाटील, तुळशीराम पाटील, जीवन चौधरी, डॉ.महेंद्र पाटील उपस्थित होते.

१५ दिवसांत भाव जाहीर करणार
आम्ही भाव जाहीर केला नसता तरी येणाऱ्या पंधरा दिवसात राज्यातील अनेक कारखान्यांपेक्षा बारामती ॲग्रो युनिट क्रमांक-४ अर्थात चोसाका, चांगला भाव जाहीर करेल, असे यावेळी यावेळी बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...