आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:घरकुलांची कामे सुरू करा अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जा

पाचोरा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे नुकतीच घरकुल, आरोग्य, महिला बाल कल्याणसह विविध विषयांवर तालुकास्तरीय आढावा बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत पार पडली. तालुक्यातील पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांनी तत्काळ कामे सुरु करावीत अन्यथा फाैजदारी कारवाईला सामाेरे जावे, असा इशारा बैठकीत सीईअाे पंकज आशिया यांनी दिला.

पाचोरा येथील अल्प बचत भवनात झालेल्या आढावा बैठकीत डॉ. पंकज आशिया यांनी घरकुल, आरोग्य, महिला बाल कल्याण विभागाची दिलेले उद्दिष्ट व झालेल्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीत तालुक्यातील घरकुलांचा प्रश्न चांगलाच गाजला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना पंचायत समिती स्तरावरुन १५ हजाराचा पहिला हप्ता देवूनही काम सुरू न केल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच काही ग्रामसेवकांची कानउघाडणी केली. पाचोरा तालुक्यात पंतप्रधान घरकुल योजनेचे ५ हजार ८२७ तर रमाई/शबरी घरकुल योजनेचे १ हजार घरकुले करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. तर तालुक्यातील घरकुलांचा १ लाख ४० हजारांच्या अनुदानापैकी पहिल्या हप्ता १५ हजार पाया खोदण्यासाठी दिलेला असताना अनेक लाभार्थ्यांनी अद्याप काम केले नसल्याने संबंधित ग्रामसेवकांची कानउघाडणी केली. तसेच संबंधित लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करा अन्यथा त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाईचे आदेश दिले.

आढावा बैठकीत गटविकास अधिकारी अतुल पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी एम. एस. भालेराव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, महिला बाल प्रकल्प अधिकारी जजिाबाई राठोड, पशुधन विकास अधिकारी डॉ. सुजाता सावंत, विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे, राजकुमार धस, सुनील पाटील, राजेंद्र गढरी उपस्थित होते. या वेळी ग्राम सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, तालुकाध्यक्ष नंदकिशोर पाटील, विकास पाटील, नितीन बोरसे, संतोष शिवनेकर, के. डी. गोसावी, सतीश सत्रे, राजेंद्र बैसाणे, नारायण परदेशी, अरुणा राठोड, प्रमोद जगताप, प्रतिभा लोणारी व कर्मचारी उपस्थित होते. गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजकुमार धस तर दिलीप सुरवाडे यांनी आभार मानले.

लसीकरणासह आराेग्य विभागाचा घेतला आढावा
गत काळात लंम्पीमुळे मृत्यू झालेल्या गुरांची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी वरिष्ठ विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पशुधन विभागाच्या डॉ. सुजाता सावंत यांना दिले. महिला बाल कल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांना ग्राम पंचायतीतर्फे देण्यात येणारे खाद्य किट योग्य प्रमाणात मिळाले की नाही, याची खात्री करत आरोग्य विभागाने केलेल्या विविध लसीकरण, कुटुंब कल्याण योजनेच्या कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान आवास योजना
एकुण उद्दिष्ट ५८२७, मंजूर घरकुल ५७०३, प्रथम हप्ता ५४४९, पूर्ण घरकुले ३२१८, प्रगतीत असलेले घरकुले ३५४.

बातम्या आणखी आहेत...