आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा:शासनाची अधिकृत मान्यता नसताना शहरात सुरू; अमळनेरातील दोन शाळा होणार बंद

अमळनेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाची अधिकृत कोणतीही मान्यता नसताना शहरात सुरू असलेल्या दोन शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे. त्यात अमळनेर येथील रॉयल उर्दू प्राथमिक शाळा आणि रॉयल उर्दू ज्युनियर कॉलेज या दोन शाळांचा समावेश आहे.

शिक्षण हक्क कायदा २००९ ची अंमलबाजवणी १ एप्रिल २०१० पासून सुरू झाली आहे. या अधिनियमाच्या कलम १८(५)नुसार शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाची मान्यता किंवा परवानगी पत्र असल्याशिवाय, शाळा सुरू करता येत नाही. अनधिकृत शाळा सुरू केल्यास एक लाख रुपये दंड आणि त्यानंतरही सुरू असल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड करण्याची तरतूद आहे. मात्र असे असूनही जळगाव जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू होत्या. म्हणून ११ फेब्रुवारी २०२२ रोजी शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करून शाळा बंद करण्याचे आदेश दिले. कागदपत्रे तपासली असता अनधिकृत शाळा आढळून आल्या.

बातम्या आणखी आहेत...