आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांस विक्री करण्यास बंदी घालावी:पाचोऱ्यात उघड्यावर मांस विक्री बंद करा

पाचोरा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात उघड्यावर मास विक्री सुरु असून सध्या हिंदू धर्माचा पवित्र श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात प्राणी-मात्रांची कत्तल सुरु असून शहरातील उघड्यावर मांस विक्री करण्यास बंदी घालावी, अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील मुख्य चौकात व काही भागातील रस्त्यावर राजरोसपणे मांस विक्री होत आहे. जारगाव चौकापासून ते भडगाव रोडवर मांस विक्रीची दुकाने रस्त्यावर लागतात. त्यामुळे किरकोळ अपघातांसह पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे मांस विक्रीची दुकाने मटण मार्केटमध्ये स्थलांतरित करुन रस्त्यावरील मांस विक्री कायमची बंद करावी, अशा मागणीचा निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. हे निवेदन देताना सचिन येवले, महावीर गौड, योगेश पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...