आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे बंद:ग्रामपंचायतीकडे वीज बिल थकल्याने तळईत पथदिवे बंद; ग्रामस्थ त्रस्त

तळई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरंडोल तालुक्यातील तळई येथे जवळपास १२ दिवसांपासून गावातील पथदिवे बंद आहेत. ग्रामपंचायतीने वीज बिल भरले नसल्याने वदि्युत महामंडळाने गावातील पथ दिव्यांचा वीजपुरवठा बंद केला आहे. या समस्येमुळे ग्रामस्थांना रात्री बाहेर निघताना त्रास सहन करावा लागत आहे.

तळई येथील ग्रामपंचायतीकडे वीज बिल थकल्याने गावातील पथदिव्यांची वीज जोडणी बंद केल्याची माहिती वायरमन इच्छाराम पाटील यांनी दिली. हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जवळपास ४० हजार रुपयांचा भरणा कराव लागणार आहे. त्यानंतरच वदि्युत पुरवठा पूर्ववत होऊ शकतो, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले. दमऱ्यान, पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

काही दिवसांपासून परिसरात चोऱ्यांचे ही प्रमाण वाढलेले आहे. तर पथदिवे बंद असल्याने तळईत ही चोरी होऊ शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. गावातील पथदिवे बंद असल्याने वृद्ध नागरिकांसह महिला व लहान मुलांना रात्री बाहेर जाताना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत जवळील खड्ड्यात पथदिवे बंद असल्याने आतापर्यंत ८ ते १० वृद्ध पडल्याचे समजते. हीच अवस्था वाहन चालकांची ही होत आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा करुन पथ दिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...