आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यालयाचा उपक्रम:धरणगावातील विद्यार्थिनींनी सैनिक बांधवांसाठी पोस्टाने पाठवल्या राख्या

चाळिसगांव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांना पाठविल्या. शालेय उपक्रमाचे हे २२ वे वर्ष आहे. अहोरात्र डोळ्यात तेल घालून सीमेवर लक्ष ठेऊन देशवासियांना सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांप्रती असलेला बंधुभाव लक्षात घेऊन विद्यार्थिनींनी राख्या तयार केल्या.

यासाठी वर्गशिक्षक डी. एम. पाटील, जे. एस. चौधरी, आर. यू. पाटील यांनी मार्गदर्शन केले. राख्या कशा तयार करायच्या याबद्दलचे प्रशिक्षण त्यांना देऊन शाळेच्या वेळेनंतर एक तास थांबून या राख्या तयार करण्यात आल्या. राख्या तयार करण्यासाठी लोकरीचे रंगी-बेरंगी धागे वापरण्यात आले. यात तिरंगा राख्या आकर्षक वाटत होत्या. शाळेचा हा दरवर्षीचा उपक्रम असून यापूर्वी सीमेवरून अनेकदा पत्रे शाळेस प्राप्त झाली आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ नाशिक विभाग यांचेदेखील अभिनंदन पत्र शाळेस प्राप्त झाले आहे. शाळेच्या उपक्रमाबद्दल संस्थाध्यक्ष डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा पाटील, पर्यवेक्षक ए.एस. पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थिनींच्या राख्या पाहून त्यांच्या कलेचे कौतुकही केले.

बातम्या आणखी आहेत...