आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवावा

एरंडोलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून शैक्षणिक प्रगती करावी, असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले. अँग्लो उर्दू हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अँग्लो उर्दू हायस्कूलच्या पटांगणावर अायाेजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जहिरोद्दीन शेख कासम यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमास डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, शिक्षणाधिकारी विकास पाटील, ज्येष्ठ अधिव्याख्याता सी. डी. साळुंखे यांची उपस्थिती हाेती. या वेळी उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षकांना मार्गदर्शन केले. तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते प्रदर्शनातील विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्यांना बक्षिस वाटप करण्यात आले. प्रदर्शनात तालुक्यातील ९५ शाळांनी तर १९७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

प्रदर्शनात ३९ प्राथमिक आणि ९ माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते. तसेच प्राथमिक गटातून ७७ तर माध्यमिक गटातून ५८ विद्यार्थी प्रदर्शनात सहभागी झाले होते. प्रदर्शनात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर उपकरणे सादर केले. आमदार चिमणराव पाटील यांनी प्रदर्शनाची पाहणी करून उपकरणांबाबत माहिती जाणून घेतली. तहसीलदार सुचिता चव्हाण, गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिस देण्यात आले.

प्रदर्शनाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनात केले होते. उपमुख्याध्यापक शेख सलीम शेख यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रदर्शनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र महाजन, जे. डी. पाटील व सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांनी सहकार्य केले. या विज्ञान प्रदर्शनाला शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शाळांनी मिळवले पारिताेषिक
विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागात तालुक्यातून जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक एकला प्रथम तर रा. ति. काबरे विद्यालयास द्वितीय अाणि न्यू इंग्लिश स्कूलला तृतीय क्रमांक मिळाला. माध्यमिक विभागात कासोदा येथील लिटल स्कूल या शाळेस प्रथम तर सम्यक इंग्लिश स्कूलला द्वितीय तर रिंगणगाव येथील आर. एन. पाटील विद्यालयास तृतीय क्रमांक मिळाला. तसेच प्राथमिक शिक्षकांमध्ये माळे सर यांनी, माध्यमिक शिक्षकांमधून अभिमान पाटील यांनी तर परिचर गटातून अश्फाक बागवान यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

बातम्या आणखी आहेत...