आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त सहभाग:नेरी येथील विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

नेरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर पंचायत समितीचा शिक्षण विभाग व नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनता हायस्कूल येथे ३ सप्टेंबरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला असून उच्च प्राथमिक गटातील ८६ तर माध्यमिक गटातील ४२ विद्यार्थ्यांनी तसेच चार शिक्षकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव वर्षा पाटील तर उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे उपस्थित होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या खोडपे, माजी सभापती बाबुराव घोंगडे, पंचायत समिती सदस्य अमर पाटील, रमण चौधरी, गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार, गटविकास अधिकारी व्ही. एम. सनेर, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, एन. एफ. चौधरी, पोषण आहार अधीक्षक विष्णू काळे, संचालक अनिरुद्ध पाटील, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष गोपाल पाटील, मुख्याध्यापक आर. ए. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. पाटील, एन. बी. पाटील तसेच केंद्रप्रमुख, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन शिक्षक प्रशांत वाघ यांनी केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असे गटविकास अधिकारी सनेर यांनी आवाहन केले. उद्घाटक दिलीप खोडपे, अध्यक्षा वर्षा पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास बाल वैज्ञानिक घडू शकतात, असे प्रतिपादन केले. ‘दिव्य मराठी’चे संपादक दीपक पटवे यांनी ही या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...