आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील बहुतांश शाळांनी दहावीच्या निकाला १०० टक्के यश मिळवण्याची परंपरा कायम राखली आहे. स्वयंअध्ययन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचे पाठबळ यामुळेच परीक्षेत यश मिळाल्याची भावना गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
सारखे गुण मिळवत दोघांना प्रथम क्रमांक
स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयातील, धनश्री प्रभाकर शिंदे व हेमंत कांतीलाल शिंदे या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत प्रत्येकी ९३.८०% गुण मिळवले.
सारखे गुण मिळवून दोन्ही विद्यार्थी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, पर्यवेक्षक मोहन चव्हाण, वर्गशिक्षक बी.एस.पाटील यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.
वाकोद येथील शाळेत मुलींची प्रथम पाच क्रमांकावर बाजी, शिक्षकांनी केले कौतुक
शेंदुर्णी येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी द्वारा संचालित वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई जैन कनिष्ठ विद्यालयाचा दहावीचा ९४.३६ टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी २१३ विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी २०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून रेकनोद सुरेली गोविंदसिंग ही विद्यार्थिनी प्रथम आली असून तिला ९०.२० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तर द्वितीय क्रमांक गायत्री जगदीश भगत (८८.६०%), तृतीय क्रमांक खुशी सतीश हरसोळे (८७.६०%) हिने मिळवला आहे. चतुर्थ क्रमांक साक्षी योगेश हसतोडे (८७.४०%), पाचवा क्रमांक मयूरी गजानन देठे (८७%)हिने मिळवला आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम पाचही क्रमांकावर विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतीश काशीद, सहसचिव दीपक गरुड, महिला संचालिका उज्ज्वला काशीद, वसतिगृह सचिव कैलास देशमुख, मुख्याध्यापक व्ही. के. चौधरी, जैन चॉरिटीजचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
मनस्वी साळीला ९१.८० टक्के
येथील मनस्वी संदीप साळी या विद्यार्थिनीने दहावीत ९१.८०% गुण मिळवले. तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. स्वयंअध्ययन, कुटुंबाचे पाठबळ आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळाल्याचे मनस्वीने निकालानंतर बोलताना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.