आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काैतुक‎:पारोळा येथील जिल्हास्तरीय नेट बॉल‎ स्पर्धेत धुळे संघाचे यश; खेळाडूंचे काैतुक‎

पारोळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात विद्यापीठ‎ अंतर्गत विभागीय मुले व मुलींच्या नेट बॉल स्पर्धा घेण्यात‎ आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संचालक अॅड. रोहन‎ मोरे यांनी केले. या स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार व एरंडोल‎ अशा चार विभागातील मुले व मुलींच्या संघांनी सहभाग‎ घेतला हाेता.

या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील,‎ एरंडोल विभागाचे सचिव डॉ. देवदत्त पाटील, डॉ. राजेंद्र‎ सोनवणे, डॉ. भारत चालसे, डॉ. नितीन वाळके, डॉ. भालचंद्र‎ मोरे, प्रा. सचिन पाटील, प्रा. जे. बी. सिसोदिया, डॉ. शैलेश‎ पाटील, क्रीडा संचालक डॉ. संजय भावसार उपस्थित होते.‎ मुलांच्या विभागात धुळे संघ विजयी तर एरंडोल विभाग‎ उपविजेता ठरला. तर मुलींच्या विभागात धुळे विभाग विजयी‎ तर एरंडोल विभाग उपविजेता ठरले. डॉ. मनीष करंजे यांनी‎ सूत्रसंचालन केले. डॉ. संजय भावसार यांनी आभार मानले.‎‎

बातम्या आणखी आहेत...