आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडर्न पेंटाथलॉन‎ स्पर्धा:आठ खेळाडूंचे पुण्यातील‎ विविध स्पर्धांमध्ये यश‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चौथी राज्यस्तरीय मॉडर्न पेंटाथलॉन‎ स्पर्धा व मिनी ऑलिम्पिक पात्रता‎ स्पर्धा बालेवाडी क्रीडा संकुल येथे‎ घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम‎ धावणे नंतर शूटिंग व जलतरण असे‎ तीन प्रकार होते. स्पर्धेत पोलिस‎ जलतरण तलाव येथील आठ‎ जलतरणपटूंनी यश मिळवले.‎ १९ वर्षांखालील मुलांमध्ये तलाह‎ सिद्दिकी चौथ्या, अमेय नगरकर‎ पाचव्या, हर्षवर्धन महाजन‎ आठव्या, आयान शेख‎ नवव्यास्थानी आला.

१९‎ वर्षांखालील मुलींमध्ये धनश्री‎ जाधव पाचव्यास्थानी आली. १७‎ वर्षांखालील मुलांमध्ये ओम चौधरी‎ तृतीयस्थानी. मुलींमध्ये लाजरी‎ खाचणे चौथ्यास्थानी, जान्हवी‎ महाजन पाचव्यास्थानी आली. या‎ सर्वांची मॉडर्न पेंटाथलॉन‎ ऑलिंपिक स्पर्धेत निवड झाली.‎

बातम्या आणखी आहेत...