आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:महाजन आश्रमशाळेचे विज्ञान प्रदर्शनात यश

बहाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढे येथील कै.सौ. बहिणाबाई धनाजी महाजन अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उद्धवराव महाजन, सचिव आदित्य महाजन यांच्या मार्गदर्शनात नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय तालुका विज्ञान प्रदर्शनात यश मिळवले.

भडगाव येथील वाय.एम. खान हायस्कूलमध्ये झालेल्या या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी लहान गट व इयत्ता नववी ते बारावी मोठा गट अशा दोन गटात विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. इयत्ता सहावी ते आठवी या गटात इयत्ता आठवीची विद्यार्थिनी प्रियंका दिनेश पावरा व मनीषा रामा वसावे या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या तण कापणी यंत्रास तृतीय क्रमांक मिळाला भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाघ व गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. या विद्यार्थिनींना शाळेतील विज्ञान शिक्षक किशोर शिंपी व विज्ञान शिक्षिका विद्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष उद्धवराव महाजन व संस्थेचे सचिव आदित्य महाजन यांनी अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक विजय महाजन व मुख्याध्यापक शिवाजी महाजन यांनीही विद्यार्थिनींचे काैतुक केले.

बातम्या आणखी आहेत...