आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळेची बचत:चोपड्यात ड्रोनद्वारे ऊस पिकावर होतेय फवारणी

चोपडा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ऊसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे चोसाका व बारामती अॅग्रो युनिट क्र.४ तर्फे, गुरुवारपासून (दि.८) ड्रोनद्वारे फवारणी सुरु केली आहे.तालुक्यातील गणपूर, चहार्डी, मंगरुळ या गावांमध्ये ऊसावर ड्रोनद्वारे बिव्हीएम हे जैविक औषध फवारले जात आहे.

ड्रोनमुळे वेळेची बचत होत आहे. चोपडा तालुक्यात एकूण ९ हजार एकरपैकी ४ हजार पेक्षा जास्त एकरवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कृती समितीचे एस.बी.पाटील, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांनी फवारणीसाठी पाठपुरावा केला होता. आगामी दोनन दिवसांनी ड्रोनची संख्या वाढवली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व भागांमध्ये लवकरच ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येईल अशी माहिती, कार्यकारी संचालक अकबर पिंजारी यांनी दिली. फवारणी सुरु झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...