आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे विभाग:सुरत-भुसावळ पॅसेंजर सुरू होण्याआधीच रद्द ; रेल्वे विभागाने दिले तांत्रिक कारण, लोकभावना तीव्र

अमळनेर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे अडीच वर्षांपासून बंद असलेली सुरत-भुसावळ पॅसेंजर पश्चिम रेल्वेने बुधवारपासून पुन्हा (८ जून) सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, ही गाडी सुरू होण्याआधीच अनिश्चित काळासाठी रद्द केली. त्यामुळे खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमानी व सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले. गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटणार होती. दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ वाजता भुसावळ स्थानकात पोहोचणार होती. मात्र, ही गाडी सुरत स्थानकातून सुटण्याआधीच रद्द केल्र्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. गाडीबाबतची माहिती ऑनलाइन सिस्टिममधून काढून टाकल्याने कुठेही बुकिंग झाले नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. खान्देशातून सुरतकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, अनेकांनी ऑनलाइन व तिकीट खिडकीवरून बुकिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, किती लोकांनी बुकिंग केले याची आकडेवारी रेल्वे विभागाकडून मिळू शकली नाही. ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केले असेल त्यांना ऑनलाइन पैसे रिफंड होतील, असे सांगण्यात आले आहे. खान्देशातील प्रवाशांची गैरसोय भुसावळ-सुरत पॅसेंजरमुळे खान्देश, विदर्भातील प्रवाशांची मोठी सोय होणार होती. खान्देशातील अनेकांचे नातलग गुजरातमध्ये आहेत. वजळगाव, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार या खान्देशातील शहरातील प्रवाशांना सुरत पॅसेंजर गाडीची प्रतीक्षा होती.

पत्रात कारण दिलेले नाही ^सुरत-भुसावळ-सुरत ही पॅसेंजर गाडी सुरू होणार होती. मात्र, पश्चिम रेल्वेकडून पत्र प्राप्त झाले आहे. पुढील आदेशापर्यंत ही गाडी सुरू केली जाणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. गाडी रद्द करण्याचे काहीही कारण पत्रात नमूद करण्यात आलेले नाही. - बी. अरुणकुमार, मंडळ वाणिज्य प्रबंधक

बातम्या आणखी आहेत...