आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांडूळ जातीचा साप जप्त:रोझोदा येथे मांडूळासह संशयिताला अटक

रावेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रोझोदा येथील एकाच्या घरातून मांडूळ जातीचा साप जप्त करण्यात आला. यावल व रावेर वन विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी कारवाई केली. देवेंद्र गिरधर लिघुरे यांच्या राहत्या घरात मांडूळ जातीचा साप असल्याची माहिती वन विभागाला मिळाली.

यानंतर उप वनसंरक्षक प्रथमेश हाइपे यांनी यावल पूर्व विभागाचे वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर, रावेरचे वनक्षेत्रपाल अजय बावणे, वनक्षेत्रपाल (फिरते पथक) आनंदा पाटील यांना कारवाईची सूचना केली. त्यांच्या पथकाने कारवाई करून मांडूळ जातीचा साप ताब्यात घेतला. देवेंद्र लिथुरे याच्या विरूद्ध वन अधिनियम १९२७ व वनजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...