आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामांडळ येथे वाळूची अवैद्यरित्या चोरटी वाहतूक करण्यास विरोध करणाऱ्या ३५वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सात जणांचा जमावाने ट्रॅक्टरखालीचेंगरून वगुप्तांगावर फावड्याने वार करून खून केल्याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दोन महिने उटले तरी या प्रकरणात मुख्य संशयित फरार हाेता. त्याला मारवड पाेलिसांनी ५ राेजी अटक केली. वाळू वाहतुकीस जयवंत यशवंत कोळी (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने विरोध केला म्हणून सात जणांनी ट्रॅक्टर खाली चेंगरून व पावडीने गुप्तांगावर वार करुन त्याचा निर्घृण खून केल्याची घटना १६ जानेवारी रोजी रात्री घडली हाेती.
यातील मुख्य संशयित अशोक लखा कोळी (वय ५२) घटनेनंतर फरार झाला होता. ताे सूरत येथे पळून गेला होता. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या माहितीवरून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात संशयित शिंदखेडा येथे येत असल्याचे समजले.
त्यानुसार डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाने, पीएसआय विनोद पाटील यांनी हवालदार संजय पाटील, सुनील आगोने, पोलिस नाईक सुनील तेली, अनिल राठोड, उज्ज्वल पाटील, तुषार वाघ, दिनेश पाटील यांच्या पथकासह ५ राेजी शिंदखेड्या बाहेर त्यास अटक केली. त्यानंतर त्यास मारवड पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणात यापूर्वीच ६ संशयितांना मारवड पोलिसांनी अटक केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.