आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी:फत्तेपूर औट पोस्टमधून संशयित पसार

जामनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फत्तेपूर औट-पोस्टमधून चौकशीसाठी आणलेला एक आरोपी शुक्रवारी दुपारी पसार झाला. त्या आरोपीच्या शाेधासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना शेतशिवारातून धावपळ करावी लागली.

किन्ही येथील प्रभाकर दुर्योधन सुरवाडे यांच्या घरातून १५ दिवसांपूर्वी ८ हजारांची चोरी झाली होती. सुरवाडे यांच्या भावाने फिरोज तडवी यास रात्री भावाच्या घराकडून निघताना पाहिले होते. त्यामुळे फिरोज तडवी याच्या नावानिशी तक्रार दिल्याची माहिती सुरवाडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. तेव्हापासून फिरोज तडवी पसार होता. तो पाचोऱ्याला नातेवाइकाकडे असल्याची माहिती मिळाल्याने फत्तेपूर औट-पोस्टच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी तडवी यास पाचोऱ्यातून ताब्यात घेत फत्तेपूरला आणले. मात्र, फत्तेपूर औट-पोस्टतून तडवी याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांना शेतातून धावपळ करावी लागली.

अटक नव्हे, चौकशी केली
फिरोज तडवी हा चोरीच्या प्रकरणातील संशयित आहे. त्यास अटक केलेली नव्हती, फक्त चौकशीसाठी पोलिस चौकीवर आणले होते, अशी माहिती पोलिस हवालदार किरण शिंपी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...