आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस व महिला काँग्रेसतर्फे महागाई, भ्रष्टाचार यासह केंद्र व राज्य सरकार यांची प्रतीकात्मक होळी दहन करण्यात आली. यावेळी दाेन्ही सरकारांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार ईश्वर जाधव, शहर महिला शहराध्यक्ष अर्चना पोळ यांनी हे सरकार जनतेला कसे फसवत आहे ते सांगितले. घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे, शेतकऱ्याच्या कपाशी, कांदा व भाजीपाला या मालाला भाव नाही, शेतकरी मेटाकुटीस आला आहे पण सरकार बेमालूमपणे महागाई वाढवत आहे, याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. आगामी काळात या दाेन्ही सरकारांनी महागाई व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालवावे, तसे न केल्यास काँग्रेस पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असे जाहीर केले.
यावेळी अशोक खलाणे, रमेश शिंपी, प्रदीप देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवेंद्रसिंग पाटील, रवींद्र पोळ, सुधाकर कुमावत, आर.जी. पाटील, पक्ष पदाधिकारी रवींद्र पाटील, बापू चौधरी, नितीन परदेशी, गया शेख, सलीम शहा, योगेश चव्हाण, प्रज्ज्वल जाधव, नितीन पवार, मोहम्मद दानिश, सागर नागणे, सुनील पाटील, सलीम शहा, लता वाणी, अनिता सूर्यवंशी, मधु गवळी, मनोज चव्हाण, जितेंद्र भोसले, सुनील पाटील, भिकन खाटीक यासह असंख्य महिला पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.