आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:निवृत्त जवानास मारहाण करणाऱ्या पोलिस निरीक्षकावर कारवाई करा; रयत सेनेची आंदोलन करून निवेदनाद्वारे मागणी

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा येथील सेवानिवृत्त जवानास किरकोळ कारणावरून चोपडा येथील पोलिस निरीक्षकांनी पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देत मारहाण केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षकाकडे केली आहे. यासाठी साेमवारी सकाळी अपर पोलिस अधीक्षक कार्यालयसमाेर आंदोलन करण्यात आले.

मारहाण करणाऱ्या पोलिस निरीक्षक चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. लवकर कारवाई न झाल्यास रयत सेनेतर्फे राज्यातील निवृत्त जवानांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. या प्रसंगी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, संता पैलवान, पी. एन. पाटील, आबासाहेब गरुड, गोकुळ पाटील, गोविंद वाघ, अनिल कोल्हे, स्वप्निल गायकवाड, मुकुंद पवार, भरत नवले, सतीश पवार, संदीप पाटील, किरण आढाव, दीपक देशमुख, रवींद्र जाधव, रमेश पवार, भूषण पाटील, प्रवीण देसले, किरण पाटील, जयेश शिंदे, विजय देवरे, चंद्रकांत पाटील, विकास पवार आदींची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...