आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरानजीक असलेल्या टाकळी प्र.चा भागातील शिवशक्ती नगरच्या पुढे श्रीराम नगरापर्यंतच्या निकृष्ट रस्त्याचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण करावे अन्यथा रहिवासी पंचायत समितीसमोर आंदोलनास बसतील, असा इशारा नागरिकांनी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
शहरानजीक असलेल्या टाकळी प्र.चा भागातील शिवशक्ती नगरच्या पुढे श्रीराम घरापर्यंतचा १० लाख रुपये खर्चून केलेला काँक्रीट रस्ता गेल्या सहा महिन्यांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झाला होता. परंतु संबंधित एजन्सी अथवा ठेकेदाराने हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात हा रस्ता मध्यभागी जमिनीपासूनच तडा गेला आहे. यासंदर्भात संबंधित अधिकारी व आमदार चव्हाण यांच्याकडे तक्रारही केली होती.
संबंधित ठेकेदार अथवा एजन्सी सदरील रस्ता नव्याने करतील अथवा साईडपट्ट्या भरून दुरुस्त करतील, अशी अपेक्षा होती. मात्र ६ महिने उलटूनही रस्त्याच्या साईट पट्ट्या व निकृष्ट रस्ता नव्याने केला नाही. अखेर पावसाळा सुरू झाल्याने परिसरातील रहिवाशांनी गुरुवारी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली.
निवेदनावर भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील निकम, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे न्याय निवारण अधिकारी सुरेश वेळीस, रामलाल चौधरी, महेश चौधरी, श्रीराम कुमावत, माधवराव देवरे, प्रकाश खैरे, अर्जुन जगताप, साहेबराव मोरे, विजय मोरे, सुभाष पवार, अभिमन पिलोरे, कैलास तुपे, शिवाजी पाटील, रमेश चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.