आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शन:पाळधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; प्राथमिक गटात अयान खाटीक, माध्यमिक गटात धीरज पाटील प्रथम; १२३ शाळा झाल्या सहभागी

धरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव पंचायत समितीचा शिक्षण विभाग व भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पसतर्फे ४९वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जीपीएस कॅम्पस येथे झाले. यात तालुक्यातील १२३ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध प्रकल्प सादर केले. प्रदर्शनात प्राथमिक गटात अयान खाटीक, माध्यमिक गटात धीरज पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

प्रदर्शनाचे उद्घाटन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे प्राचार्य अनिल झोपे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, जीपीसचे कार्यकारी संचालक प्रतापराव पाटील, पं.स.चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, मुख्याध्यापक डी. डी. कंखरे उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांनी केले. परीक्षण डी. ए. धनगर, संजय पाटील, आर. सी. कोळी यांनी केले. ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन, नाना पाटील यांनी आभार मानले.

उच्च प्राथमिक, माध्यमिक व शिक्षक शैक्षणिक साहित्य गटाचा निकाल
उच्च प्राथमिक गट ( इयत्ता सहावी ते आठवी) : प्रथम क्रमांक अयान अलाउद्दीन खाटीक, गुड शेफर्ड स्कूल, धरणगाव (बायोक्लॉक उपकरण), द्वितीय अंकिता बोरसे, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, निंभोरा (स्मार्ट हेल्मेट), तृतीय राज पाटील, माध्यमिक विद्यालय भोणे (गणितीय खेळणे), उत्तेजनार्थ रेहान खान, नितीन नाथ, भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश स्कूल, पाळधी (३-डी होलोग्रम), प्राजक्ता पाटील, इम्पेरियल स्कूल, पाळधी ( हाय फाय मॉडेल).
माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (इयत्ता नववी ते बारावी) : प्रथम क्रमांक धीरज पाटील, भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालय, पाळधी (स्वयंचलित पथदिवे), द्वितीय यशोदीप पालीवाल, सा. दा. कुडे माध्यमिक विद्यालय, धरणगाव (स्मार्ट वेहिकल), तृतीय नीरल चव्हाण, पी. आर. हायस्कूल, धरणगाव (भूकंप निर्देशक), उत्तेजनार्थ पवन पाटील, मा. ना. काबरे विद्यालय, सोनवद (सुलभ व सुरक्षित प्रवास), उत्तेजनार्थ चेतना कोतकर, इंदिरा गांधी विद्यालय (३ आर मंत्राज).
प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य : प्रथम क्रमांक योगिता लोखंडे, जि. प. शाळा, धानोरे (बहुउपयोगी शैक्षणिक साहित्य), द्वितीय शेख नबी शेख गणी, जि. प. उर्दू शाळा १, धरणगाव (मॅजिक गणित), तृतीय वर्षा साळुंखे, जि. प. शाळा, वंजारी (खेडकर गणित), उत्तेजनार्थ वैशाली जाधव, जि. प. कन्या शाळा, पाळधी (पर्यावरण).
माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य : प्रथम भारती पाटील, इंदिरा गांधी विद्यालय, धरणगाव ( सिम्बॉल ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट), प्रयोगशाळा सहाय्यक गट प्रथम धनंजय शेवाळे, सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय, बोरगाव (गणितीय संकल्पना), द्वितीय ज्ञानेश्वर गायकवाड, पी. आर. हायस्कूल, धरणगाव (व्यसनमुक्ती).

बातम्या आणखी आहेत...