आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:तापी पुलाचा कठडा तुटल्याने धोका; वाहन पुलावरून कोसळण्याची शक्यता

धानोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विदगावजवळील तापी पुलाच्या कठड्याला मध्यभागी तीन ते चार फुटांचे मोठे भगदाड पडले आहे. हे भगदाड धोकेदायक असून त्यामुळे वेळप्रसंगी गंभीर दुर्घटनेचा धोका वाढला आहे. त्यामुळे लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.कोळन्हावी- विदगाव रस्त्यावरील तापी नदीच्या पुलावर अहोरात्र वर्दळ सुरू असते. सध्या पावसाळ्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठावर दोन्ही बाजुंनी निसर्गरम्य हिरवळ दाटली आहे. यामुळे अनेक वाहनधारक परीवारासह फोटो काढण्यासाठी पुलावर थांबतात. यामुळे सकाळी व संध्याकाळी पुलावर गर्दी होते. यातच पुलाच्या एका बाजुच्या कठड्याला तीन फुटांचे मोठे भगदाड पडले आहे.

यामुळे लहान मुलांना कठड्याच्या भगदाडामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन, भगदाड दुरुस्त करावे, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.धानोरा जवळील तापी पुलाचा कठडा असा तुटला आहे. यामुळे एखादे वाहन पुलावरून खाली थेट तापीच्या पात्रात कोसळण्याची भीती आहे. तरीही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...