आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे स्वामी भक्तानंदजी यांनी स्थापन केलेला ‘भक्तांना भक्तीचा बगीचा अर्थात श्री श्री १००८ श्री दादाजी दरबार म्हणजे श्री स्वामी भक्तांनंदजी महाराजांचे समाधी-स्थळ आहे. या ठिकाणी कोरोनाच्या दोन वर्षानंतर ३० जून रोजी दादाजी धुनिवाले प्रतिष्ठानतर्फे तापीमाई जन्मोत्सवाचे आयोजन केले आहे. गेल्या दोन वर्षापासून जागतिक कोविड महामारीमुळे सर्व कार्यक्रम साजरे झाले नाही. पूज्य स्वामीजींनी सुरु केलेला कार्यक्रम यावर्षी सालाबाद प्रमाणे जाहीर रित्या होणार आहे. पौर्णिमेनिमित्त विश्वस्त मंडळाची बैठक झाली असून यात आगामी तापीमाई जन्मोत्सव सप्ताह व गुरुपौर्णिमा खंडवा येथील दादाजी दरबार निशाण पदयात्रेबाबत नियोजन करण्यात आले. ३० जून रोजी तापीमाई जन्मोत्सव घटस्थापना होईल. यात सप्ताहात दररोज पहाटे ५ ते ६ या वेळेत विशेष यजमानांच्या हस्ते समाधीचा अभिषेक, पूजन, सकाळी ८ वाजता आरती, तीर्थप्रसाद, ९ वाजता आणि दुपारी २ वाजता पोथी वाचन होईल, रात्री ८ वाजता आरती, पूजन, भजन, तीर्थप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम होतील. ६ जुलैला तापीमाई जन्मसोहळा साजरा होईल. यात सकाळी ८ वाजता सवाद्य निशाण मिरवणूक, तापीमाईंचे दर्शन, पूजन, साडी-खण अर्पण करुन आरती, हवन होईल. ११ वाजता महाप्रसादाचे वितरण होईल. ७ जुलैला सकाळी ११ वाजेला खंडवा दरबार गुरुपौर्णिमा निशाण पदयात्रा सुरू होईल. ही पदयात्रा अडावद, सावदा, बऱ्हाणपूर, अशिरगड मार्गे १३ जुलै रोजी खंडव्यात पाेहोचेल. रात्री ११ वाजता श्री श्री १००८ खंडवा दादाजी दरबारमध्ये सवाद्य निशाण मिरवणूक निघेल. या वेळी मशाल रॅलीने दादाजी दरबाराला पाच प्रदिक्षणा, दर्शन व सामूहिक हवन व आरतीनंतर प्रसाद वितरण होईल. १४ जुलैला सकाळी ८ वाजता प्रचार रथासमोर आरतीने सांगता होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.