आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:नॅशनल एज्युकेशनमधील शिक्षक भरती रद्द करावी; शिक्षकांनी खोटी टीईटी प्रमाणपत्र दिल्याचा दावा

यावल17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या शहर आणि वरणगाव येथील संस्थेत शिक्षक भरती करण्यात आली. त्यात काही शिक्षकांनी खोटे टीईटी प्रमाणपत्र जोडल्याची तक्रार शिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच ही भरती रद्द करावी, अशी मागणी देखील केली आहे.नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे यावल येथे डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल आणि वरणगाव येथे फक्रुद्दीन अली अहमद विद्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी नुकतेच शिक्षक भरती करण्यात आली. मात्र, संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाची मुदत संपली आहे.

तरीही संबंधित मंडळाने शिक्षक भरती केल्याची तक्रार यापूर्वीच करण्यात आली आहे. असे असताना या संस्थेत ७ शिक्षकांची भरती करण्यात आली. यामुळे काहींनी टीईटीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार पुन्हा शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे), जळगावचे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती देणारे निवेदन यावल शहरातील हाजी गुलाम मुस्तफा हाजी गुलाम दस्तगीर, आसिफ खान ताहेरखान व युनूस खान रशीद खान यांनी दिले. त्यात शिक्षण भरती प्रक्रिया रद्द करून चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी आता पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

नियमानुसार भरती
आम्ही नियमानुसार शिक्षकांची भरती केली आहे. संबंधितांनी जी आवश्यक कागदपत्रे दिली आहेत ती आम्ही जोडली आहेत. मात्र, त्यांच्या पडताळणीचा अधिकार आम्हाला नाही. याबाबत तक्रार झाल्याने चौकशीअंती होणारा निर्णय मान्य असेल.
हाजी ताहेर शेख, संस्थाध्यक्ष, नॅशनल एज्युकेशन सोसायटी

बातम्या आणखी आहेत...