आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया मोठ्या प्रतिक्षेनंतर सुरु झाली आहे; मात्र ऑनलाइन अर्ज दाखल करतांना विविध तांत्रीक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील २८२ शाळांसाठी ४७७६ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरणाऱ्या पालकांची संख्या मोठी असून साईट हँग होत असल्याने अडचणी येत आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे मुदतवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. त्यानुसार यंदाच्या आरटीई प्रवेशप्रक्रियेत जिल्ह्यातील २८२ शाळांनी नोंदणी केली आहे. यात ३१२२ जागा उपलब्ध आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.